शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात : वर्षभराचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By admin | Updated: February 14, 2015 00:10 IST

कमी भावामुळे द्राक्ष उत्पादक चिंतित

वणी : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी दर मिळत असल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वर्षभराचे नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून असणारे उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात ८० टक्के द्राक्ष उत्पादक निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करतात. द्राक्षे उत्पादित करताना त्याची नोंदणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावी लागते. सातबारा उतारा, ज्या क्षेत्रात द्राक्षे उत्पादित करावयाची आहे. त्या क्षेत्राचे वयोमान, कोणते द्राक्ष उत्पादित करणार त्याची माहिती, छाटणीची तारीख, औषध फवारणीची माहिती, ही सर्व माहिती दिल्यानंतर १८ एमएम ते २२ एमएम आकारमान द्राक्षाचे तसेच १७ ते १८ ब्रीक्स (द्राक्षातील साखर प्रमाण) झाल्यानंतर त्या प्लॉटमधील ५ किलो द्राक्षांचा नमुना बेंगलोर किंवा पुणे येथे रेसिड्यूतपासणीसाठी पाठविण्यात येतात. तीन ते चार दिवसांनंतर अहवाल निष्कर्ष येतो, त्यानंतर अनुकूल निष्कर्ष असल्यास मागणी नोंदविण्यात येते. युनाइटेड किंगडम, दुबई या देशांमध्ये काटेकोरपणे अहवाल पालन होते. तर रशियात त्या तुलनेत अटी शिथील मात्र इंग्लडच्या सुपर मार्केटमध्ये द्राक्ष विक्रीस पाठविण्यापूर्वी अनेक क्लिष्ट व गुंतागुंतीच्या प्रणालीला उत्पादकांना सामोरे जावे लागते, अशी माहिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक माणिकराव देवरे यांनी दिली. या भागातील ग्राहक अतिशय चोखंदळ असतात. लागवडीपासून ते उत्पादनाचे त्यांचे मापदंड असतात त्यांची पूर्तता झाल्यानंतर द्राक्ष खरेदीस मान्यता मिळते. द्राक्षे परदेशात पोहोचल्यानंतर एक महिन्याच्या अंतराने काही अंशी रक्कम खात्यात जमा होते, नंतर पूर्ण द्राक्ष विक्र ीनंतर रक्कम मिळते, अशीही माहिती त्यांनी दिली. मागील वर्षी गणेश व थॉमसन या द्राक्ष जातीला ८० ते ८५ रुपये किलोचा दर मिळाला होता. आता त्याच्यात घसरण होऊन ५० ते ५५ रुपये किलो दर उत्पादकांच्या हातात पडत आहेत. काळ्या जातीच्या द्राक्षांना मागील वर्षी ११० ते ११५ रु पये प्रतिकिलो दर मिळाला होता, तर यावर्षी या प्रणालीत प्रतिकुलता आली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे ५० निर्यातदार आहेत. व प्रतिवर्षी अंदाजे ५०० कंटेनर द्राक्षे तालुक्यातून निर्यात होतात, अशी माहिती उत्पादकांनी दिली. दरम्यान, एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करून निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करून निर्यातीचा जगन्नाथाचा रथ हाकण्याचे आव्हान उत्पादकांसमोर असून, द्राक्ष विक्रीचा हा व्यवसाय ही एक आव्हानात्मक बाब आहे. (वार्ताहर)