शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:32 IST

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ१० ते १५ टक्के द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकºयांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्यावर्षी द्राक्षांचे उत्पादन वाढूनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे द्राक्षांना अपेक्षित भाव मिळाला नाही. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्णातून हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षबागायतदारांनी निर्यातीवर अधिक भर देत इंग्लंड, युरोप रशियासह अन्य देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली. त्यामुळे नंतरच्या काळात द्राक्षांच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्याचा फटक ा द्राक्षनिर्यातीला बसला नाही. बहुतांश मालाची निर्यात अंतिम टप्प्यात आली असताना आता देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले असून, मार्चअखेर द्राक्षांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना ६१ ते ८० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ३० रुपयांपासून ५०-५५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यात जसजसे बागांचे प्रमाण कमी होईल व तपमानात वाढ होईल त्याप्रमाणे वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दरही वाढतील, असा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.ओखी वादळाचा फटका व त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे यावर्षी द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना शेतकºयांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. शेतकºयांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. त्यामुळेच नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकºयांना शक्य झाले.- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ