कुंभारी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:54 IST2021-05-06T22:50:23+5:302021-05-07T00:54:19+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

Explosion of gas cylinder at Kumbhari | कुंभारी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

कुंभारी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण : सुदैवाने जीवितहानी टळली

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील कुंभारी या गावात राहणाऱ्या राजू सासवडे यांच्या घरातील दोन भरलेले गॅस सिलिंडर्सचा अचानक स्फोट झाला आणि यामुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील वस्तू खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, माहिती मिळताच पिंपळगाव येथील अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या व फोम बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. याकामी अग्निशमन विभागाचे कर्मचारी सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित काशीद, सुभाष बोंबले, दीपक निकम, संकेत दलोड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Explosion of gas cylinder at Kumbhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.