शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्सला मुदतवाढ

By admin | Updated: December 31, 2016 01:23 IST

ग्राहक डिश टीव्हीकडे : कंपन्यांचा सेवा देण्यास नकार

नाशिक : दूरचित्रवाणीवर केबलद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे डिजिटलायझेशन करण्याच्या अंतिम टप्प्याला ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे वृत्त असून, त्यामुळे ग्रामीण भागातील दूरचित्रवाणीधारकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने चार वर्षांपासून डिजिटलायझेशन म्हणजेच दूरचित्रवाणीला सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याची सक्ती दूरचित्रवाणीधारकांना केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये त्याची सक्ती करण्यात आली, त्यानंतर टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येऊन शेवटच्या टप्प्यात ग्रामीण भागात सेटटॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ अंतिम मुदत देण्यात आली होती. डिसेंबर अखेर नागरिकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याबाबत वारंवार शासनाकडून तसेच केबल कंपन्यांकडून केले जात होते. ३१ डिसेंबर नंतर म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सेटटॉप बॉक्स न बसविलेल्या दूरचित्रवाहिन्यांवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित होऊ शकणार नसल्याचेही सांगण्यात आल्याने, डिसेंबर महिन्यात जिल्ह्णातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सहा लाख, ६३ हजार ९५१ कुटुंबीयांपैैकी केबल असलेल्या ३१ हजार ५९६ कुटुंबीयांनी तातडीने सेटटॉप बॉक्स बसविण्यास सुरुवात केली. डिसेंबर अखेर सोळा हजार ९१७ कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतले असून, अजून ४७ टक्के कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसविलेले नाहीत.  सेटटॉप बॉक्स बसविण्यासंदर्भात देशभरात दूरचित्रवाहिन्यांचे उपग्रहाद्वारे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित ठिकठिकाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत, त्यावरील अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही. ३१ डिसेंबर २०१६ ही सेटटॉप बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आल्याने या संदर्भात न्यायालयाने काही निर्णय दिल्यास त्यातून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. , शिवाय केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सेटटॉप बॉक्ससाठी आर्थिक चणचण भासत असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्रीय प्रसारण खात्याने सेटटॉप बॉक्स बसविण्याला तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याचा निर्णय २३ डिसेंबर रोजीच घेतला आहे. तथापि, अद्याप या संदर्भात शासकीय यंत्रणेला कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.