शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

विजयी उमेदवारांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:52 AM

येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

नाशिक : येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या सीमा हिरे यांनी ९ हजार ५२१ मताधिक्यांनी विजय मिळविला. चुरशीच्या झालेल्या या लढतीमुळे मतमोजणी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम फेरीचा निकाल लागताच हिरे समर्थक ांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तर मध्य मतदारसंघातील भाजपाच्या देवयानी फरांदे यांना मतदारांनी पुन्हा कौल देत २८ हजार ५१३ मताधिक्यांनी विजय मिळवून दिला. यामुळे दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरात त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी मुंबई नाका परिसरात विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच यावेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे पूर्व मतदारसंघात भाजपाचे राहुल ढिकले यांनी १२ हजार १३ मताधिक्यांनी विजय मिळवत जल्लोष साजरा केला. यावेळी पंचवटी परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतशबाजी केली. तर देवळाली मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी तब्बल ४१ हजार ८६० मताधिक्यांनी विजय मिळवून शिवसेनेचा ३० वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावला. यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोडनिकालाची उत्सुकता असलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारनंतर मतमोजणी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. चारही मतदारसंघांत विजयी झालेले उमेदवार हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे शेवटच्या काही फेऱ्या शिल्लक असताना कॉँग्रेस, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्यामुळे त्यांनी परिसरातून काढता पाय घेतला.कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्कध्वनिक्षेपकावर प्रत्येक फेरीचा निकाल ऐकत कागदावर आकडेवारी करत तर्कवितर्क करण्याचे काम कार्यकर्ते करत असल्याचे दिसून आले. यावेळी काही अफवांमुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस