शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीचा उत्साह : साधला ‘सुवर्ण मुहूर्त’

By admin | Updated: October 12, 2016 00:47 IST

कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत नाशिककरांनी सकाळपासूनच बाजारात सोने, गृहोपयोगी वस्तू, वाहने खरेदीसाठी गर्दी केली होती. चोख सोन्याच्या वेढ्यापासून टेम्पल दागिन्यांना महिलांची मागणी दिसून आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या औचित्यावर शहराच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली.विजयादशमीच्या औचित्यावर बाजारपेठ चांगलीच बहरली. नागरिक बिनधास्तपणे खरेदीसाठी घराबाहेर पडले. दोन दिवसांपूर्वीच्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम यावेळी जाणवला नाही. सर्वत्र उत्साहात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. ठिकठिकाणी झेंडू, कांचनची पाने विकणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. दुपारनंतर बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने आल्याने सर्वच व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. रविवारच्या संतप्त आंदोलनामुळे व्यापारी वर्ग काही प्रमाणात चिंतेत होता. कारण सोमवारी दिवसभर शहर बससेवाही सुरू झालेली नव्हती; मात्र सोमवारी सकाळपासूनच मोबाइल इंटरनेट सेवा खंडित झाल्याने तणाव पूर्णपणे निवळण्यास मदत झाली आणि अफवांचे फुटणारे पेवही आटोक्यात आले. मंगळवारी (दि.११) सकाळपासूनच शहरासह उपनगरांमध्ये विजयादशमीचा उत्साह दिसून येत होता. मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेनरोड परिसरात दुपारी तीन वाजेनंतर नागरिकांची गर्दी उसळली होती.