लासलगावी महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: September 9, 2015 00:08 IST2015-09-09T00:08:42+5:302015-09-09T00:08:42+5:30

बाबा अमरनाथ गु्रप : ‘बम बम भोले’चा जयघोष, गर्दीचा नवा विक्रम

Excited response to Lassalgavi Mahaprasad | लासलगावी महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लासलगावी महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लासलगाव : ‘बम बम बोले ..... जय भोले....’च्या जयघोषात यापूर्वीचे गर्दीचे विक्रम पार करून सोमवारी लासलगाव येथील बाबा अमरनाथ सोशल ग्रुपतर्फेसंपन्न झालेल्या भंडाऱ्यात दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी ७ वाजता भाविकांनी दूरवर रांगा लावून महाप्रसाद घेतला. बाबा अमरनाथ सोशल ग्रुपच्या भंडाऱ्याचे हे सोळावे वर्ष असून, यावर्षीही लासलगाव व परिसरातून पंधराशे भाविक जम्मू-काश्मीर येथील बाबा अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते त्यात महिलांचाही मोठा समावेश होता. या यात्रेचा प्रसाद म्हणून या भंडार्याचे गेल्या सोळा वर्षा पासुन संयोजन केले जाते.
या वेळी पुजन विमलिगरी महाराज, शिविगरी महाराज व जोरेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. मागील वर्षी सुमारे पन्नास हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. हा आकडा पार करून नवा
विक्रम गर्दीने केला. हजारो महीला पुरूष गेल्या तीन दिवसापासुन तयारी करीत होते. जिल्ह्यातील सर्वाधीक प्रमाणात भाविकांचा सहभाग व उत्कृष्ट नियोजनामुळे हा भंडारा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात परिचित आहे. पुरु षांना व महिलांना वेगळी
व्यवस्था केली जाते. येथील बाबा अमरनाथ मंदिरात स्थानिक
कलाकार दत्ता भांबारे हे भव्य देखावा साकारले ते पाहण्यास भाविकांनी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती.
या वर्षीही पन्नास हजार भाविक महाप्रसादासाठी येतील असा ग्रुपचा अंदाज होता त्यापेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती दिली. त्या दृष्टीने बस आगारात भव्य मंडप तसेच स्वयंपाकाची तयारी करण्यात आली.

Web Title: Excited response to Lassalgavi Mahaprasad