शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

१४०० आदिवासी विद्यार्थ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 1:23 AM

कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून, शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, शिक्षक फोनद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देआश्रमशाळा : आदिवासी विकासचा उपक्रम

नाशिक : कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून, शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, शिक्षक फोनद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी करत आहेत. नाशिक विभागातील २२० शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवसभरातून तब्बल १५००हून अधिक फोन करून याबाबत माहिती घेतली जात आहे. या मोहिमेद्वारे मागील दोन महिन्यांत विभागाने विभागातील १४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या सोयी-सुविधा मिळतात त्या त्यांना घरीही मिळाव्यात यादृष्टीने विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गावनिहाय नियोजन केले असून, एका दिवसात एका गावात जाऊन तेथील सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते. याशिवाय फिरती आरोग्य पथक गावात जाऊन विद्यार्थ्यंाची तपासणी करते. यामुळे कोरोनासारख्या संकटसमयीही आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सेवा मिळत आहेत.घरातल्यांची चौकशीनाशिक विभागातील २२० शाळांमधील १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना काही आजार आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन महिन्यांच्या काळात ५ ते ६ कोरोना संशयितही आढळून आले असून, त्यांची त्वरित कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. गावागावात जाऊन तपासणी करण्याबरोबरच ज्यांच्याकडे फोनची सुविधा उपलब्ध आहे त्यांना फोन करून घरातील व्यक्तींच्या आरोग्याचीही चौकशी केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यStudentविद्यार्थी