जुन्या भांडणाची कुरापत ‌एकमेकांवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:14 IST2021-06-11T16:12:48+5:302021-06-11T16:14:35+5:30

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहरातील विविध भागांत मारहाणीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सातपूरच्या अशोकनर , श्रमीकनगर भागात अशाचप्रकारे झालेल्या मारहाणीच्या घटनेत तरुणांनी चाकूचा वापर करून एकमेकांवर वार केल्याचा प्रकार घडला आहे.

The evil of the old quarrel ‌ Knife on each other | जुन्या भांडणाची कुरापत ‌एकमेकांवर चाकूने वार

जुन्या भांडणाची कुरापत ‌एकमेकांवर चाकूने वार

ठळक मुद्देनाशकात मारहाणीच्या घटनांत वाढसातपूरला तरुणांकडून भांडणात चाकूचा वापर चाकूचे वार झाल्याने तरुण जखमी

नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जबर हाणामारीत एकमेकांवर चाकूने वार झाल्याची घटना बुधवारी (दि. ९) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर येथील संशयित तुषार जगताप (१८) यांच्यासह राहुल खरात (१८) व राकेश वाघ (२१) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून तन्मय खंडू कांबळे याला शिविगाळ केली. तसेच तुषार जगताप याने त्यांच्याकडून चाकूने तन्मयच्या उजव्या हाताच्या दंडावर, छातीवर व पाटावर उजव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले, तर राकेश वाघ व राहुल खरात यांनी शिविगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण करून दमदाटी केली. तर तुषार उर्फ बबलू जगताप याने तन्मय कांबळे, योगेश जाधव व चैतन्य निकम यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्मय, योगेश व चैतन्य यांनी भांडण मिटविण्याच्या कारणावरून कुरापत काढून योगेश जाधव याने तुषारच्या हातातून चाकू हिसकावून त्याच्या डोक्याला व त्याचा मित्र राहुल खरात याला दुखापत केल्याची फिर्याद तुषार जगताप याने केली आहे. याप्रकरणी तन्मय खंडू कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल खरात व राकेश वाघ या दोघांना अटक केली आहे.

Web Title: The evil of the old quarrel ‌ Knife on each other