शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ईएसआय लाभार्थींना खासगी रुग्णालयातून उपचारास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार विमा योजना (ईएसआय) लाभार्थी कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. ईएसआयच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

सातपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार विमा योजना (ईएसआय) लाभार्थी कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. ईएसआयच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्य कामगार विमा महामंडळाकडून राज्य कामगार विमा योजना रु ग्णालयातून कामगार आणि त्याच्या कटुंबीयास वैद्यकीय उपचार दिले जात होते. आता राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे राज्य कामगार विमा सोसायटीच्या विमाधारक कामगारांना उपचारासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार अशा कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निकडीच्या वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यास केंद्र सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत दराप्रमाणे वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे.महाराष्ट्र कामगार विमा सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सूचनेद्वारे म्हटले आहे की, विमेधारकांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणांमध्ये एकसमानता, सुसूत्रीकरण तसेच जलदगतीने निपटारा करण्यासाठी दि.१ आॅगस्टपासून आकस्मित किंवा निकडीच्या प्रसंगी खासगी रु ग्णालयातून उपचार घेतल्यास सी.जी.एच.एस. पॅकेज दरानुसार वैद्यकीय परतावा देण्यात येणार आहे.कोविड-१९ मुळे जिल्हा प्रशासनाने राज्यातील सुमारे ८ ईएसआय रु ग्णालय ताब्यात घेतलेले आहे. त्यामुळे लाभार्थींना (विमाधारक) ईएसआय रु ग्णालयातून उपचार मिळू शकत नाहीत. अशावेळी खासगी रु ग्णालयातून उपचार घेतल्यास शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार वैद्यकीय परतावा मिळण्याची सोय केली असावी. याबाबत आमच्याकडे सविस्तर अधिकृत माहिती आलेली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल