शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

वकीलवाडीत अतिक्रमणे ‘जैसे थे’; पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:13 AM

शहरातील वकीलवाडी परिसरातील दुकानदारांची अतिक्रमणे ‘जैसे थे’ असून, यामुळे पादचाºयांना चालणेही कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची केलेली कार्यवाही केवळ औपचारिकताच ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वकीलवाडी परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलीस त्याकडे लक्ष पुरवत नाही.

नाशिक : शहरातील वकीलवाडी परिसरातील दुकानदारांची अतिक्रमणे ‘जैसे थे’ असून, यामुळे पादचाºयांना चालणेही कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची केलेली कार्यवाही केवळ औपचारिकताच ठरली आहे.  शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वकीलवाडी परिसरात महापालिका आणि वाहतूक पोलीस त्याकडे लक्ष पुरवत नाही. या ठिकाणी एकेरी मार्ग असूनही त्याचा उपयोग होत नाही. वाहतूक पोलीस असलेच तर त्यांच्यासमोर रॉँगसाईडने गाडी घातली जाते. असे अनेक प्रकार आहेत.  येथील बहुतांशी व्यापारी संकुलांनी वाहनतळासाठी पुरेशी जागा सोडलेली नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भीड चेपली गेलेल्या अनेकांनी दुकानांची अतिक्रमणे, जाहिरात फलक थेट रस्त्यावर आणून ठेवली होती. परंतु त्यांच्यावरदेखील कारवाई होत नाही. मध्यंतरी महापालिकेने काही फलक उचलून नेले, त्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा दुकानदारांचे फावले आहे. रस्त्यावर कुठेही उभी केलेली वाहने, जोडीला खाद्य विक्रेत्यांची अतिक्रमणे, अरुंद मार्गावर मालवाहतूक करणाºया टेम्पोने होणारी वाहतूक कोंडी आणि एकेरी वाहनांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन या सर्व प्रकारांमुळे येथील रहिवाशांना चालणे कठीण झाले आहे.शहराच्या विविध भागांसाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस नियोजन करतात, परंतु या भागाला मात्र जाणीवपूर्वक वगळण्यात येत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. वाहनतळ नसतानाही व्यापारी संकुले बांधणाºया आणि ती भाड्याने देणाºयांवर पोलीस आणि महापालिका प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcity chowkसिटी चौक