शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘भुईकोट’ला अतिक्रमणाचा वेढा

By admin | Updated: December 31, 2016 23:08 IST

आम्ही मालेगावकर समिती : गतवैभव प्राप्त करून द्या

मालेगाव : येथील भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या भुईकोट किल्ल्याच्या देखभालीकडे शासन, पुरातत्व विभाग व महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. किल्ल्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असले तरीही इतिहासाची साक्ष सांगणारा कुठलाही फलक परिसरात नाही व संरक्षणासाठी चौकीदारही नाही. किल्ल्याच्या चारही बाजूंना मजबूत तटबंदी व बुरुज आहेत. या बुरुजावरच अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली आहेत. चारही बाजूंनी असलेले खंदक माती टाकून त्यावरही अतिक्रमण केले आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील पिढीस इतिहासाचे पुरावे सापडणार नाहीत.  बुरुजांची व तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी, किल्ल्याच्या आजूबाजूच्या खदकांमधील माती काढून खंदक पूर्ववत करावेत, किल्ल्यामध्ये विविध ठिकाणी इतिहासाची माहिती देणारे फलक लावावेत, किल्ल्याच्या आजूबाजूचे अतिक्रमणे कोणताही राजकीय मुलाहिजा न बाळगता जमीनदोस्त करावे. तसेच किल्ल्यास राज्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करावे, पर्यटन विकासासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात आदि मागण्या आम्ही मालेगावकर समितीने केल्या आहेत.  यावेळी निखिल पवार, रविराज सोनार, यू. आर. पाटील, देवा पाटील, राकेश डिडवानिया, देवेंद्र अलई, अविनाश निकम, अ‍ॅड. परीक्षित बच्छाव, दादा बहिरम, सलाम कुरेशी, विवेक वारुळे, दीपक पाटील, प्रदीप पहाडे, बाळा भुसे, संजय सोनजे, अतुल लोढा, गणेश जंगम, एम. डी. चव्हाण, रूपेश अहिरराव, कलीम अब्दुल्ला, आप्पाजी महाले, विजय निकम, करण माळी, अनिल कोतवाल, शत्रुघ्न गवळी, आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)