शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

अस्मिता योजनेद्वारे बचतगट करणार सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:06 AM

नाशिक : महिलांना आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता या योजनेची ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी महिला बचतगटांना अधिक सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : पहिल्या महिला मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन मुंडे यांच्या हस्ते आॅनलाइन अस्मिता योजना नोंदणीचे उद्घाटन

नाशिक : महिलांना आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता या योजनेची ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी महिला बचतगटांना अधिक सक्षम केले जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणाºया ‘अस्मिता’ योजनेच्या शुभारंभप्रसंगी इदगाह मैदानावर आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सभापती सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, मनीषा पवार, यतिंद्र पाटील, हिरामण खोसकर, महिला बालकल्याण विभागाचे सचिव असीम गुप्ता, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उदय सांगळे, विक्रांत चांदवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुंडे म्हणाल्या, महिलांना सन्मानाने जगण्यासाठीची अस्मिता योजना असून, तिची सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण आणि आरोग्य हा तिचा हक्क आहे. महिलांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठविला पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून अस्मिता योजना तयार करण्यात आली आहे. सॅनिटरी नॅपकिन हा या योजनेचा एक भाग आहे. महिलांचे आरोग्य आणि सामाजिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी महिलांच्या संदर्भातील अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जाणार आहे. महिला बचत गट या महिलांना लागणाºया गरजेच्या वस्तुंच्या वितरक म्हणून काम करतील, अशी योजना आहे. त्यामुळे महिला बचतगटांना सक्षम करून गाव खेड्यातील महिलांपर्यंत पोहचण्यासाठी बचत गट मोठे माध्यमत असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या बचतगटांनी शंभर टक्के कर्जपरतफेड केलेल आहे अशा बचत गटांना शून्य टक्के व्याज तत्त्वावर कर्ज देऊन या बचतगटांना सक्षम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महिला बालकल्याण विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. नरेश गिते यांनी केले. प्रारंभी मुंडे यांच्या हस्ते आॅनलाइन अस्मिता योजना नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. 1शहरी भागातही होणार विस्तारग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही अस्मिता योजनेचा विस्तार केला जाईल, असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या संदर्भात आपण यापूर्वीच नगरविकास खात्याशी चर्चा केल्याचे सांगितले. सॅनिटरी नॅपकीनची किंमत पाच रुपये असली तरी ही किंमत शून्यापर्यंत आणण्याचा मानस असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुक्ता बेंडकुळेने वेधले लक्षअस्मिता योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी त्र्यंबकेश्वरजवळील कस्तुरबा गांधी विद्यामंदिर शाळेची इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी मुक्ता बेंडकुळे हिने हजारो महिलांपुढे सॅनटरी नॅपकिनविषयी केलेल्या भाषणाने सर्वांनाच खिळवून ठेवले. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह व्यासपीठावर साºयाच अवाक होऊन मुक्ताचे भाषण ऐकत होते. भाषण संपल्यानंतर स्वत: मुंडे यांनी तिचे फूल देऊन कौतुक करीत आस्थेने विचारपूस केली. मुंडे यांनी आपल्या भाषणात अनेकदा मुक्ताच्या नावाचा उल्लेख केला.

सुमतीबाई सुकळीकर योजनामहिला बचतगटांना सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. बचतगटाच्या माध्यमातून अशिक्षित महिलादेखील सक्षम आणि संघटित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रत्येक नागरिकस्वच्छतादूत व्हावा...राज्यातील केवळ १७ टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरत असून, हे चित्र अतिशय भयावह आहे.सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांच्या आरोग्याचे रक्षण होणार असल्याने प्रत्येकाने स्वच्छता दूत म्हणून गावागावात हा आरोग्याचा संदेश पोहचविण्याचे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.