सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By Admin | Updated: January 20, 2017 01:34 IST2017-01-20T01:34:32+5:302017-01-20T01:34:59+5:30

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

Empowering the four gang-raped men | सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

नाशिक : एका अल्पवयीन मुलीला दमबाजी करून चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची निंदनीय घटना २०१६ च्या मार्च महिन्यात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयित आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.
दिंडोरी तालुक्यातील सोनगाव शिवारातील एका मळ्याजवळ २० मार्च २०१६ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास चौघा नराधमांनी 
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्याकडे या गुन्ह्णाचा तपास सोपविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. चौघा आरोपींना प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास चौघा नराधमांना तीन वर्षे सश्रम कारावास अधिक भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील दीपशिखा भिडे यांनी कामकाज करत एकूण सहा साक्षीदार न्यायालयापुढे तपासले. दरम्यान, पीडित मुलीची साक्ष व डीएनए अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले.

Web Title: Empowering the four gang-raped men