शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत नोकरभरती

By admin | Updated: December 31, 2016 00:24 IST

अत्यावश्यक सेवा : शासनानंतर महासभेचा हिरवा कंदील

नाशिक : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेनेही वैद्यकीय अधिकारी व अभियंता तसेच मिस्तरी या एकूण ६५ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला.  महापालिकेच्या महासभेत आयुक्तांकडून सदर भरतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. एकीकडे दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे प्रमाण वाढत असताना आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरतीस मनाई आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अत्यावश्यक सेवांवर मात्र मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्याने प्रशासन चिंतीत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे विशेष बाब म्हणून दि. २० एप्रिल व २१ मे २०१६ रोजी प्रस्ताव पाठविला होता आणि आस्थापना खर्चाच्या मर्यादेतून शिथिलता देऊन महापालिकेस नोकरभरतीची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही रिक्त पदे अत्यावश्यक बाब म्हणून भरती करण्याचा प्रस्ताव दि. १ जून २०१६ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्तरी या एकूण ६५ पदांसाठी सरळ सेवेने भरती करण्यास परवानगी दिली होती.
सदर भरतीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत ठेवण्यात आला असता, महापौर अशोक मुर्तडक यांनी त्यास कोणत्याही चर्चेविना हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३२, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २ आणि मिस्तरी १४ अशी एकूण ६५ पदे सरळ सेवेने भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, महासभेत, नगरचना विभागाच्या सर्वेक्षण कामासाठी सल्लागार सर्वेक्षक एजन्सीची नेमणूक करणे आणि नगररचना विभागातील मार्च २०१७ पर्यंतच्या सर्वेक्षण कामासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यासही महासभेने मंजुरी दिली.