शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अकरा कोटींचा रस्ता महिन्यातच उखडला

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

निकृष्ट : सटाणा-देवळा रस्ता काम गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह

ठेंगोडा :विंचूर : प्रकाशा राज्य महामार्गावरील सटाणा ते देवळा या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून या रस्त्याचे काम ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यावर सुरू आहे. मात्र यंदाच्या पहिल्या पावसातच ठेंगोडा गावाजवळ व इतर अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सटाणा-देवळा रस्त्यावर गेल्या वर्षी ठिकठिकाणी अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर यासंदर्भात सदर रस्त्याची दुरुस्ती व या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत लोकमतमध्ये दोनदिवसीय मालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्या वृत्ताची दखल घेऊन शासनाने सदर रस्त्याच्या अपघातप्रवण भागात उपाययोजना करण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार सदर रस्ता कामास सुरुवातही करण्यात आली. मात्र सदर रस्ता कामातील अनियमितता व रस्ता कामात संबंधितांकडून होत असलेले मनमानी धोरण यामुळे वाहनधारकही अवाक् होत आहेत. वाटेल तेथे कामास सुरुवात करणे व सुरू असलेले काम वाटेल तेथे बंद करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी इतरत्र काम सुरू करणे अशा प्रकारे सटाणा ते देवळा रस्त्याचे सुरू आहे. रस्त्यावर साईडपट्ट्या रुंदीकरणासाठी रस्ता खोदून ठेवून काम पूर्ण न करता दुसऱ्या ठिकाणी काम सुरू करणे अशा पद्धतीने सदर काम होत असल्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर सूचना फलकाअभावी अनेकदा अपघातही घडले. मात्र संबंधित विभाग आपल्या पद्धतीनेच काम करत राहिला आहे. मनमानी पध्दतीने सुरू असलेल्या या कामातील रस्ता अवघ्या महिन्याभरातच ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे करदात्या जनतेत व वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर कामाचे मूल्यमापन करावे, अशी मागणी उपसरपंच प्रकाश बागुल यांच्यासह परिसरातील जनतेने केली आहे.