वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:36 IST2018-07-03T16:35:45+5:302018-07-03T16:36:43+5:30

वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी
नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्यात तेजसकुमार सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नासीरखान कुरेशी याने विद्युत वितरण कंपनीने पुरविलेल्या वीजमीटरच्या (क्रमांंक - ११८९३००१८) मागील बाजूस छिद्र पाडून त्याठिकाणी एमसील लावले़ तसेच इनकमिंग फेज व आऊटगोईंग फेज, इनकमिंग न्यूट्रल व आऊटगोईग न्यूट्रल सोबत असलेल्या कॉपरच्या तारेने हुक करून मीटर हळूहळू फिरेल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून विजेची चोरी केली.
संशयित कुरेशी याने दोन वर्षाच्या कालावधीत विद्युत वितरण कंपनीचे २१ हजार ६०० रुपयांची वीजचोरी केली असून त्यामध्ये ४ हजार रुपये दंडही नमूद करण्यात आला आहे़