शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे विजेची उपकरणे जळाली

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

रोहित्रातील बिघाडामुळे नागरिकांना फटका

पेठ : ऐन उन्हाळ्यात वीज वितरण कंपनीने एकीकडे वीज दरवाढीचा शॉक दिला असून, दुसरीकडे याच कंपनीच्या गलथानपणामुळे ग्राहकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार घडला आहे.शहरातील बाजारपेठ परिसरातील वीज वितरण कंपनीच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने अनेक घरांमधील टीव्ही, रेफ्रिजरेटर आदि विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत. रोहित्र बदलण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे नागरिकांना दुपारी उकाड्याने हैराण केले.आज सकाळी ७ वाजेदरम्यान बाजारपेठ परिसरातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्याने अनेक घरांमधील बल्ब उडाले. काही समजण्याच्या आत टीव्ही संच व रेफ्रिजरेटरही नादुरूस्त होऊन बंद पडले. नंतर याची चर्चा होताच नागरिकांनी बल्ब व अन्य उपकरणे बंद केली. परंतु वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नक्की किती घरांमधील विद्युत उपकरणे खराब, नादुरूस्त झाली याची माहिती मिळू शकली नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना १ वाजेदरम्यान माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठेतील वीजपुरवठा बंद करण्यात आला असला तरीही सायंकाळी उशिरापर्यंत रोहित्र बदलण्याचे काम सुरू करण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांना ऐन दुपारी उकाड्याचा सामना करावा लागला. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्कसाधला असता त्यांनी सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची कामे बंद पडत असल्याचे कारण दिले असून, नागरिक वीजपुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करत आहेत. (वार्ताहर)