शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

एका उमेदवारामुळे पाच जागांसाठी निवडणूक

By admin | Updated: September 26, 2015 23:18 IST

जिल्हा कृषी औद्योगिक संघ : ‘त्या’ची माघार नाहीच

नाशिक : अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक होण्याची चिन्हे असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३८ (३) या संवर्गासाठी निवडणूक होणे अटळ ठरले आहे.२५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची अंतिम मुदत होती. या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेची माघारीची वेळ असताना प्रत्यक्षात माघारी नाट्य मात्र सायंकाळ उशिरापर्यंत चालल्याचे चित्र होते. अगदी शेवटच्या क्षणी सर्व जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगत इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, मात्र १५ संचालक असलेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या महत्त्वाच्या संवर्गात पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी का होईना, निवडणूक होणार आहे. मात्र बिनविरोध निवडून आलेल्या काही संचालकांनी ही निवडणूक बिनविरोधच होणार, असा दावा केला आहे. मात्र माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत अपेक्षित जागांपेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिल्यास त्या जागेसाठी निवडणूक घेणे, हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत नमूद असते. त्यानुसारच आता जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या ३८(३) या संवर्गासाठी निवडणूक होणार आहे. या संवर्गासाठी पाच जागा असताना प्रत्यक्षात सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे कळते. त्यात प्रकाश कवडे, सोमनाथ मोरे, तुकाराम पेखळे, दिलीप मोरे, बाळासाहेब गायकवाड आणि संदीप पानगव्हाणे या सहा उमेदवारांचे अर्ज शिल्लक असल्याचे समजते. या संवर्गात अवघे ५१ मतदार असल्याने मतदारांना सहा पैकी पाच उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. संघाच्या १०० ते २००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८ (१) तसेच २०० ते ५००० भाग भांडवल असलेल्या मतदारांसाठी ३८(२), तर पाच हजारांच्या पुढे भाग भांडवल असलेल्या ३८(३) असा गट (संवर्ग)आहे. ३८(१) व ३८(२) या संवर्गात संचालक पदाइतकेच अर्ज आल्याने या दोन्ही संवर्गासाठी निवडणूक बिनविरोध झाल्यासारखी आहे. (प्रतिनिधी)