‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चित्रप्रदर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:31 IST2020-01-24T15:29:08+5:302020-01-24T15:31:12+5:30
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या चित्रप्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चित्रप्रदर्शनाला सुरुवात
नाशिक : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांगर्तत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोतर्फे शुक्रवारी (दि.२४) भोसला सैनिकी शाळेच्या प्रांगणात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या चित्रप्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना महापौर यांनी असे सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाºया हुतात्मांची माहिती नवीन पीढीला होणे गरजेचे आहे, त्या साठी हे चित्र प्रदर्शन महत्वाचे काम करेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, वंद्य वंदे मातरमचे संयोजन समितीचे अध्यक्ष शेदुराम रु ंग्ठा, सचिव सुधीर मुतालिक, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती उपस्थित होते. हे प्रदर्शन २४ ते २६ जानेवारीपर्यंत ठेवण्यात आल आहे. याचित्र प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्यांवर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तसेच सशस्त्र क्र ांतीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या लढयात सामिल होणारे आणि यासाठी फाशीवर चढणारे निवडक क्र ांतीवीरांची माहितीसुद्धा या चित्र प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. तसेच ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताविषयी माहिती या प्रदर्शनात चित्र पोस्टरच्या माध्यमतातून देण्यात आली आहे. तर नाशिकमधील स्थानिक क्र ांतिकारकांची माहिती येथे मांडण्यात आली आहे.