शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचनेवर आठ हरकती

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

मंगळवारपर्यंत मुदत : ९ नोव्हेंबरपर्यंत होणार सुनावणी

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत आठ हरकती प्राप्त झाल्या असून, मंगळवार (दि. २५) पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी ४ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त हरकतींवर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते, परंतु आयोगाने त्यात सुधारणा करत सुनावणीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. आरक्षण सोडतीच्या दिवशीच महापालिकेचे प्रारूप प्रभाग घोषित झाले होते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा १० आॅक्टोबरला करण्यात आली होती. त्यानंतर १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेकडे आतापर्यंत आठ हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग १७ मधून सेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांनी कॅनॉलरोडवरील झोपडपट्टीला आक्षेप घेत नैसर्गिक हद्दीचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. सदर झोपडपट्टी ही प्रभाग २० ऐवजी १७ मध्ये समाविष्ट करण्यास त्यांनी विरोध केला आहे. माजी नगरसेवक संजय भालेराव यांनीही प्रभाग १७ मधून वगळलेल्या भागाबाबत आक्षेप घेत भौगोलिक सलगतेच्या दृष्टीने त्यांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. नितीन चिडे यांनी नवले चाळीचा समावेश प्रभाग २१ मध्ये करण्याची सूचना केली आहे. सेनेच्या माजी नगरसेवक सत्यभामा गाडेकर यांनी वालदेवी नदी व रेल्वे गेट हे अडथळे असताना व त्याबाजूला जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसताना चुकीच्या पद्धतीने प्रभाग २२ ला जोडण्यात आला आहे. सदर भाग हा प्रभाग १९ ला जोडण्याची सूचना गाडेकर यांनी केली आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष अजिंक्य साने यांनी प्रभाग १३ मध्ये सारडा सर्कल ते खडकाळी चौक या रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग व त्यातील काही वस्त्या बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार केली आहे. अस्तित्वात नसलेले रस्तेही दाखविण्यात आल्याचे साने यांनी स्पष्ट केले आहे. साने यांच्याबरोबरच परेश लोथे यांनीही हीच तक्रार करत काही भाग प्रभाग १४ मध्ये समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. करणसिंग रामसिंग बावरी यांनी प्रभाग १५ हा परिसर गावठाण भागात येत नसतानाही तीन सदस्यीय तर प्रभाग १४ हा सर्व परिसर गावठाण भागात येऊनही तो चार सदस्यीय करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदविला आहे. कौस्तुभ परांजपे यांनी तर संपूर्ण प्रभागरचनेलाच हरकत घेतली आहे. हरकती दाखल करण्यासाठी दि. २५ आॅक्टोबरपर्यंत मुदत असून, शनिवार व रविवारी सुटी आहे. त्यामुळे सोमवारी-मंगळवारी आणखी हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)