शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

 तीन टोळ्यांतील आठ गुंड तडीपार;  नाशिकरोड, उपनगर, सिकडोतील गुन्हेगारांना दणका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 6:37 PM

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको  पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळक्यांतील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनाशकातून आठ गुंड तडीपार तीन गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईनाशिक, उपनगर, सिकोतील गुन्हेगारांंना दणका

नाशिक : शहर व जिल्हयात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको  पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळक्यांतील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबा बब्बु शेख याचे टोळीतील अक्षय बाळु धुमाळ(२३, रा. आरींगळे मळा, मोसिन युसुफ पठाण, (२६, रा. सादीक नगर, वडाळागाव)  शुभम ज्ञानेश्वर सुर्यवंशी (२०, रा. देवळालीगाव, राजवाडा) यांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच   उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभवानीरोड फर्नाडिसवाडीतील मयुर चमन बेद (३१)  याच्यासह त्याच्या टोळीतील संजय उर्फ  मॉडेल चमन बेद (३३) रोहित उर्फ  माथ्या उर्फ बंटी, गोविंद महाले उर्फ  डिंगम (२३) यांचाही तडीपारांमध्ये  समावेश असून अंबड पोलीस स्टेशन हद्दीत उपेंद्रनगर येथील  मोबीन तन्वीर कादरी व त्याचा साईबाबा नगर येथील साथीदार गौरव उमेश पाटील यांच्याविरोधात परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले आहेत.  नाशिक शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे पासून शहरातील जनतेचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच आगामी सण, उत्सव शांततेत पार पडावेत या करीता अशा गुन्हेगारां विरुध्द हृदुदपारी तसेच स्थानबध्दतेची कारवाई  पोलीस आयुक्त यांच्या  मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून गुन्हेगारांसह त्यांचे समर्थक व त्यांना बेकायदेशिरपणे मदत करणारे सर्वच स्तरातील व्यक्तींनाही  नैतिक व सामाजिक जबाबदारीचे भान देवून आपले वर्तनात सुधारणा करावी असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.  नागरिकांनीही  साध्या वेशातील पोलीस म्हणून निर्भिडपणे पोलीसांना माहिती/तक्रारी देवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच हद्दपार इसम नाशिक शहर व नाशिक (ग्रामिण) जिल्हयात दिसून आल्यास पोलीसांना माहिती दयावी. जेणेकरुन अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत होईल असेही पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी स्प्ष्ट के ले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय