शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

By Admin | Updated: July 2, 2015 00:32 IST2015-07-02T00:31:48+5:302015-07-02T00:32:07+5:30

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

Education Committee Chairs for the post of Chairman | शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरसनाशिक : महापालिका शिक्षण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी येत्या शनिवारी (दि.४) निवडणूक होणार असून, गुरुवारी (दि.२) सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, सभापतिपदासाठी अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांचे नाव पुढे केले जात असतानाच महाआघाडीतील कॉँग्रेसनेही त्यात उडी घेतली असून, आजवर सत्तेत वाटा न मिळाल्याबद्दल नाराजी दर्शविली आहे.
शिक्षण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी दि. ४ जुलैला सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. सभापती-उपसभापतिपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, नगरसचिव विभागाकडून अपक्ष गटनेते संजय चव्हाण व कॉँग्रेसच्या सदस्य वत्सला खैरे आणि योगीता अहेर यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. महापौर आणि स्थायी समिती सभापती, तसेच प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी महाआघाडी दिसून आल्याने शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही महाआघाडी कायम राहील, असे चित्र दिसत असताना महाआघाडीतील धुसफूस आता बाहेर येत आहे.
पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या दोन सदस्यांनी बंड केल्याने कॉँग्रेसच्या उमेदवार योगीता अहेर यांना हार पत्करावी लागली होती.
सदरचा पराभव कॉँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याने शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने लढण्याची तयारी चालविली आहे. शिक्षण समितीत मनसे-५, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी ३, भाजपा व कॉँग्रेस प्रत्येकी २ आणि १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.
महाआघाडीने अगोदरपासूनच अपक्ष संजय चव्हाण यांचे सभापतिपदासाठी, तर गणेश चव्हाण यांचे उपसभापतिपदासाठी नाव पुढे केलेले असल्याने याच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेसने जरी महाआघाडीत न राहण्याचा निर्णय घेतला तरी मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांचे मिळून ९ संख्याबळ होते. त्यामुळे त्यांचा सभापती सहजपणे विराजमान होऊ शकतो. परंतु कॉँग्रेसने उडी घेतल्याने चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Education Committee Chairs for the post of Chairman