ंमालेगाव : तालुक्यातील जळगाव (निं) शिवारात विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात असताना विहिरीत पडल्याने मच्छिंद्र पिरन कराडे (२०) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. साहेबराव पटांग्रे या डॉक्टरांनी तालुका पोलिसात खबर दिली. मच्छिंद्र हा दिवसभर शेतात कांदा लावण्याचे काम करून सायंकाळी किशोर कराडे यांच्या शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.अंबड लिंकरोड येथे विवाहितेची आत्महत्त्यानाशिक : अंबड लिंकरोड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}