निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

By Admin | Updated: February 26, 2017 00:45 IST2017-02-26T00:45:30+5:302017-02-26T00:45:45+5:30

निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

During the painting of Nifad, two people were killed by electric shocks | निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

निफाड : येथे मंगलकार्यालयाच्या इमारतीचे रंगकाम काम चालू असताना लोखंडी शिडीचा धक्का शेजारील उच्चदाब विद्युत वाहिनीला लागून विजेचा जोरदार धक्का बसल्याने रंगकाम करणारे दोघे कामगार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. निफाड येथील शनिमंदिर मागे असलेल्या रविराज मंगल कार्यालयाच्या दक्षिण बाजूकडील भिंतीला
रंगकाम चालू होते या इमारतीला खेटून दक्षिण बाजूने रंगकाम करण्यासाठी असलेली लोखंडी शिडी लावलेली होती. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान  गोकळ शंकर लोखंडे( ४७) ,राजेंद्र दगू जगताप (२७) आणि गजानन बबन जाधव ( २९) हे तिघे शिडीवर उभे राहून रंगकाम करीत होते. हे काम करीत असताना शिडीच्या वरच्या टोकाचा शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला त्यामुळे या शिडीत विदुयत प्रवाह शिरल्याने विजेचा जबर धक्का बसून गोकुळ लोखंडे , राजेंद्र जगताप, हे दोघे जागीच ठार झाले. तर गजानन जाधव जखमी झाले असून यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात उपचार चालू आहे मयत गोकूळ लोखंडे आणि राजेंद्र जगताप यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी निफाड येथील उपजिल्हारु ग्णालयात करण्यात आली मृत गोकुळ लोखंडे आण ि राजेंद्र जगताप यांच्या मृत्यूमुळे निफाड मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
अधिक तपास निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: During the painting of Nifad, two people were killed by electric shocks