टायर फुटल्याने डंपरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 01:36 IST2022-02-07T01:35:48+5:302022-02-07T01:36:13+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक टायर फुटून डंपरच्या मागील भागास आग लागल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

Dumper fire due to flat tire | टायर फुटल्याने डंपरला आग

टायर फुटल्याने डंपरला आग

सिडको : मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक टायर फुटून डंपरच्या मागील भागास आग लागल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या एका डंपरचे टायर अचानक फुटून डंपरच्या मागील भागास आग लागली. मात्र प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ अग्निशमन दलासह पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. त्यामुळे अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आर. ए. लाड, एन.के.व्यवहारे, पी.जी. लहामगे, एस.डी .भालेराव, एस. बी. शिलावट आदींनी एका बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dumper fire due to flat tire