शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट

By संजय पाठक | Updated: March 22, 2019 01:38 IST

गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांवर थेट होत आहे.

ठळक मुद्देबॉशमध्ये ‘ले आॅफ’ : अनेक कंपन्यांनी उत्पादन घटविले

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांवर थेट होत आहे. आॅटोमोबाइल हब असलेल्या नाशिकमधील वाहनपूरक उद्योग अडचणीत आले असून, बॉश कंपनीतील काही कामगारांना ले आॅफ (पगारी सुटी) देण्यात येणार आहे, तर अन्य काही उद्योगांमध्ये इन आउट (फक्तयेण्या-जाण्याची नोंद करून घरी जाणे) ची कार्यवाही होत असल्याचे वृत्त आहे.केंद्रीय औद्योगिक धोरणात उद्योगांसाठी कोणतेही आश्वस्त नसल्याने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी या कारणांमुळे वाहन उद्योगासह अन्य उद्योगांवर आर्थिक मंदीचे सावट कोसळले आहे, असे औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरु वात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लहान मोठ्या उद्योगांना त्याचा फटका बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अग्रेसर असलेल्या ‘मारु ती सुझुकी’ या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने सुमारे ३० टक्के उत्पादन बंद केल्याने नाशिकमधील बहुराष्ट्रीय बॉश कारखान्यालाही या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे, असे समजते. कंपनीने कामगारांना पुढील आठवड्यात ले आॅफ देण्याची तयारी केली आहे, अधिकृत सूत्रांनी त्यास दुजोरा दिला असून, पुढील आठवड्यात सोमवार ते शनिवार पगारी सुटी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.ग्राहकांकडून वाहन खरेदी कमी होत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला असून, त्यामुळेच अशाप्रकारे ले आॅफ दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बॉश कंपनीवर अवलंबून असलेल्या शेकडो लघु उद्योगांना (वेंडर्स) आणि तेथे काम करणाºया हजारो कामगारांवरदेखील बेरोजगारीची वेळ आली आहे. बॉशसह अशा अनेक कारखान्यांना आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे.इलेक्ट्रॉनिक कारचा उद्योगावर परिणामप्रदूषणमुक्त धोरणाचा अवलंब केला जात असल्याने राष्ट्रीय पातळीवर ‘बीएस ६’ ही प्रणाली वाहन उद्योगांना बंधनकारक केली जात आहे. डिझेलवर चालणारी वाहने २०३० पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वाहन उद्योगांनी इलेक्ट्रिककार उत्पादन करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे वाहन उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही आपल्या उत्पादनात बदल करणे अनिवार्य ठरणार आहे. लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारात येणार असल्याने नवीन कार घेऊ इच्छिणाºया ग्राहकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचाही परिणाम वाहनांच्या मागणीवर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था