शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:43 IST

दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पाटोदा : दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कूपनलिका कोरड्यापडल्या तर बोअरवेल, हातपंप, कूपनलिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केले आहे. पशुपालकांना जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न पडला आहे. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासच्या वर गावे व तीस वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहेत. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरू न केल्यामुळे या भागातील नागरिकांना व मजुरांना काम नसल्यामुळे हे मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात तसेच राज्यात जात असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हातांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.दुष्काळाशी झगडत जगण्याची बेरीज मांडताना अस्मानी-सुलतानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसह मजुरांची जगण्याची लढाई अपयशी ठरत आहे. शासनाने या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळेल.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकºयांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी