शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त

By admin | Updated: November 11, 2015 00:06 IST

जलचिंतनचा दावा : रब्बीला आवर्तनच नाही मिळणार

नाशिक : खरिपाच्या एकूण आवर्तनापेक्षा जास्तीचे पाणी सिंहस्थ शाहीस्नानामुळे गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने जिल्ह्यातील शेकडो एकर शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे.जलचिंतन संस्थेमार्फतच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळल्यानंतर नुकतेच गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी व दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांविरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आरोप केले होते.जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, दारणा धरणातून तरी यापुढे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. मात्र गंगापूर धरणातून शेतीसाठी एक थेंबही आता आवर्तन सुटणार नसल्याने या परिसरातील शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गंगापूर धरण समूहात १७०.८० दलघमी पाण्याचा उपयुक्त साठा असून, त्यापैकी या खरिपात ५४.५८ दलघमी पाणी वापरण्यात आले. तसेच २२५.३८ पाणीसाठा १५ आॅक्टोबर २०१५ पर्यंत उपलब्ध होता. त्यापैकी ३८.३८ दलघमी म्हणजेच १.३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले, तर दारणा धरण समूहात ३८६.८८ दलघमी पाणीसाठा उपयुक्त होता. त्यापैकी १६५.९९ पाणी खरिपासाठी वापरले गेले. दारणा धरण समूहात ५५२.८७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. दारणा समूहातून ९१.८७ दलघमी अर्थात ३.२४ टीएमसी पाणी सोडावयाचे आहे. त्यामुळे दारणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन मिळू शकते. मात्र गंगापूर समूहातून शेतीसाठी आवर्तन मिळणे मुश्कील आहे. गंगापूर धरण समूहातून ६०० दलघफू (१७.२ दलघमी) पाणी खरिपासाठी अनुज्ञेय होते. मात्र सिंहस्थ शाहीस्नान व वाढलेल्या लोकसंख्येमुळे मनपाकडून ५४.५८ दलघमी (१.९२ टीएमसी) पाण्याचा वापर चार महिन्यांत झाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन मिळणे अवघड आहे. आता महापालिकेच्या पाण्यात कपात करून शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. नाही तर शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे राजेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)