शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: January 23, 2016 22:50 IST

नायगाव खोरे : रब्बीची पिके तरारल्याने शेतकऱ्यांत समाधान

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीमुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र, रब्बी हंगामातील पिके गारव्याने तरारली असल्याने शेतकरी-वर्गात समाधान व्यक्त होत आहे.आठवडाभरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. दिवसभरही जाणवणाऱ्या जोरदार थंडीमुळे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडून पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातील गारव्यासह सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी दररोज पडत असल्यामुळे नित्याच्या दिनक्रमासह व्यवहारिक कामेही उशिराने सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच कामांचे वेळापत्रक विस्कटले आहे. थंडीपासून बचाव करणारे सर्व साधने या थंडीच्या कडाक्यात कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सकाळी दहा - अकरा वाजेपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत असून, जनजीवनावर थंडीचा परिणाम दिसून येत आहे.माणसांपेक्षा जनावरे व पक्ष्यांवर थंडीचा परिणाम जास्त दिसून येत आहे. पाळीव जनावरांच्या तुलनेत मोकाट जनावरे व कुत्र्यांना त्याचा अधिक फटका बसत आहे. सकाळच्या वेळेत शाळेत जाणारे विद्यार्थी व चाकरमान्यांना वेळेचे बंधन पाळताना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांतल्या ढगाळ वातावरणामुळे खराब झालेली रब्बीतील पिके थंडीमुळे चांगलीच तरारली आहेत. दररोज वाढणाऱ्या थंडीमुळे पिकांवरील विविध कीटक, मावा, तुडतुड्यांचा प्रभाव कमी पडत असल्याने शेतमालात सुधारणा होतांना दिसून येत आहे. रब्बीच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. शेतमालाबरोबरच आरोग्यासाठीही हितावह असणाऱ्या थंडीचे प्रमाण वाढत राहिल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. (वार्ताहर)