कसारा घाटात ट्रक पलटी, चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:59 IST2019-06-12T17:58:09+5:302019-06-12T17:59:46+5:30
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अवजड भंगारने भरलेला ट्रक नागमोडी वळणावर पलटी झाल्याने या ट्रक मधील चालकाचा केबिनच्या आतमध्ये दबुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

कसारा घाटात पलटी झालेला ट्रक.
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अवजड भंगारने भरलेला ट्रक नागमोडी वळणावर पलटी झाल्याने या ट्रक मधील चालकाचा केबिनच्या आतमध्ये दबुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.
बुधवारी (दि.१२) सकाळी सात वाजेच्या सुमारास ठाणे येथुन नाशिक येथे जाण्यासाठी भंगार भरलेला ट्रक (एम.एच. ०४ सीयु १३८१) हा जुन्या कसारा घाटात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिबलवाडी शिवारातील आंबा पाँईट येथे विरुद्ध दिशेच्या लेनवर पलटी झाला. त्यात ट्रक चालक राजेश बिंद, (३० रा. भिदवड. उत्तर प्रदेश) याचा कँबिनमध्ये अडकुन जागीच मृत्यु झाला. यामुळे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.
यावेळी महामार्गावरील गस्त घालणारे रु ट पेट्रोलिंगचे अधिकारी रवि देहाडे व त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन ट्रकच्या चालकास केबिनच्या बाहेर काढुन इगतपुरीला ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तपास महामार्ग पोलीस घोटी (टॅब) व इगतपुरी पोलीस करीत आहेत.