शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:02 IST

नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.

ठळक मुद्दे उगवणीवर परिणाम : पेरणीचा खर्च गेला वाया; तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.जिल्ह्यात यावर्षी चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांची खरिपाची लगबग सुरू आहे. मागील वर्षी लष्करी अळीमुळे बेजार झालेल्या शेतकºयांनी यावर्षी मक्याऐवजी सोयाबीनला पसंती दिली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.वाहतुकीत हादरे बसले तरी नुकसान शक्यजिल्ह्याच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला वाफसा होण्यासाठी किमान ६० ते ७० मिलीमीटर पाऊस पडणे आवश्यक आहे. अनेक पेरणीची घाई करून थोड्या वापशावर पेरणी केली. त्यामुळे सोयाबीन उगवण क्षमतेवर परिणाम झाला. सोयाबीनचे बियाणे नाजूक असते त्याला वाहतुकीत थोडेफार हादरे बसले तरी त्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. अनेक शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. बियाणे अधिक खोल गेले तरी बी जमिनीतच सडते, असे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे उपसंचालक कैलास शिरसाट यांनी सांगितले. काही शेतकºयांच्या पेरण्या पूर्ण होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. ज्या शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली त्यातील काही शेतकºयांनी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही शेतकºयांचे बियाणे एकदमच पातळ उतरले आहे. यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे.अनेक शेतकरी जमिनीत ओलावा नसताना पेरणी करतात. त्याचा उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. सोयाबीनमध्ये हायब्रीड बियाणे नाही. घरचे बियाणे आणि कंपनीच्या बियाणांमध्ये फरक असतो. घरच्या बियाणाची उगवणक्षमता कमी असल्यास मात्रा वाढविणे गरजेचे असते.- प्रा. तुषार उगले,के. के. वाघ कृषी महाविद्यालयसोयाबीन बियाणाचे जर्मेनेशन परसेंटेज कमी असल्यामुळे ते कमी असल्यामुळे ते उगवत नाही. अनेक शेतकºयांनी यावर्षी घरचे बियाणे वापरले आहे. त्याची त्यांनी उगवणक्षमता तपासणे आवश्यक होते. काहींनी ती न तपासताच पेरणी केली. जिल्ह्यात सुरुवातीला पहिलाच मोठा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकºयांनी पेरणीस सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या दोन पावसामुळे बियाणे दाबले गेले. त्याचाही उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळीच पाऊस आला होता. त्यामुळे अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. ज्यांनी घरचे बी वापरले असेल त्याचाही परिणाम उगवण क्षमतेवर झाला आहे.- प्रकाश कदम, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सोयाबीन उताºयाची यावर्षी समस्या निर्माण होणारच आहे. कारण मागीलवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बियाणाची उगवण क्षमता खूपच कमी आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे २०० ते ३०० टन बियाणे पडून आहे. कारण त्याची उगवण क्षमताच खूप कमी आहे. त्यामुळे ते शेतकºयांनी दिलेच नाही. यावर्षी शेतकºयांनी शक्यतो घरचेच बियाणे वापरायला हवे. त्याचीही उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असल्यामुळे सोयाबीनला पोषक वातावरण आहे.- सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र, निफाड

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी