शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक : आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धा केटीएचएमला फिरता करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

ठळक मुद्देनेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राज्यभरातून स्पर्धक

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्वर्गीय दादापाटील केदार यांच्या स्मरणार्थ येथील महाविद्यालयात या वर्षापासून स्मृती करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माचा समारोप व बक्षीस वितरण महंत तुळशीराम महाराज गुठ्ठे, हरिष आडके व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रथम पाच हजार रु पये, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार व उत्तेजनार्थ एक हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब कासार व नीलेश वाक्चौरे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप भाबड, प्रशांत उगले, राजेंद्र केदार, जगदीश माळी, मारु ती इलग, बाळासाहेब देशमुख, अरुण आव्हाड, सोमनाथ आव्हाड, कल्पना घुगे, सविता भागवत, सविता घुले आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच लीला सांगळे, उपअभियंता अविनाश लोखंडे, कारभारी आव्हाड, विश्वास खेडेकर उपस्थित होते. दोडी महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात, त्यामुळे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. तसेच अशा आयोजित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व अभिव्यक्ती कलेला वाव मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.राज्यभरातून स्पर्धकांचा प्रतिसादआंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांक निखिल नगरकर (अहमदनगर) व अशोक चंद्रभान शिंदे (पारनेर) यांनी पटकाविला.द्वितीय क्र मांक विवेक सतीश चित्ते, तृतीय क्र मांक श्वेता भामरे व हर्षल औटे यांनी मिळविला, तर उत्तेजनार्थ ज्ञानेश्वर सानप, सारिका पवार यांनी पटकावले. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाने फिरता करंडक घेतला. स्पर्धेत परीक्षक म्हणून राजेंद्र सांगळे, कैलास गोपाळे, शेषराव डमाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत अहमदनगर, नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, औरंगाबाद, सातारा, सांगली इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. दिवसभर सुरू असलेल्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तसेच अनेक श्रोते उपस्थित होते. स्पर्धकांच्या वक्तृत्वातून सखोल अभ्यास दिसून येत होता.