शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे.

त्र्यंबकेश्वर : निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे. आता सकाळी येणाºया   मेदवारालाही...आणि दुपारनंतर येणाºया उमेदवारालाही हो म्हणावे लागते. त्यातल्या त्यात त्र्यंबकेश्वरची तर बातच निराळी..... त्र्यंबकला पूर्वी पाचच वॉर्ड होते.  त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने ही स्पेशल केस नगरपालिका केवळ यात्रेकरुंना सोयी सुविधा देण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका स्थापन केली गेली आहे. आजही शहराची लोकसंख्या केवळ बारा हजार पाचशे एवढी असून, मतदार संख्या अवघी दहा हजारापर्यंत आहे. पूर्वी लोक भोळे होते. त्यांच्या हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता मतदार हुषार झाला आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो. काही मतदार तर बिलंदर असतात. त्यांना माहीत असते की पालिका प्रशासन कामे करणारच असते.  शासकीय योजनांचादेखील लाभ होणारच असतो. नगरसेवक एकदा निवडून गेला की, तो पाच वर्षे आपल्याकडे ढुंकून पहायलादेखील वेळ मिळत नसतो. त्यापेक्षा याला घ्या काढून असा सोयीचा विचार करून मतदार मतदानापूर्वी बेरजेचे राजकारण करूनच मतदान करतात. तर उमेदवारदेखील सत्ता मिळाली की, आपल्याच तोºयात राहतो. प्रभागात काम केलेच तर माझ्यामुळे झाले. त्यासाठी शिलालेख वगैरे लावण्याची घाई होते. मोठेपणा मिरविता येतो.  मतदार आपल्या समस्या रेटून सांगू शकत नाही. कारण तोच नगरसेवक म्हणू शकतो, मी कुठे तुमचे मत फुकट घेतले ? अशी शोकांतिका मतदारांची होत असते. आणि मतदाराने नाहीच म्हटले तर उमेदवारांना वाटते, म्हणजे आपल्याला मतदान होणार नाही. म्हणून उमेदवाराच आग्रह करतो, आमच्या समाधानासाठी तरी घ्याच. भेट समजा. नाही म्हणू नका. अशी पद्धत रूढ झाली आहे.  पूर्वीच्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत हाच फरक आहे. पूर्वी नगरसेवक कामे  करीत, म्हणूनच खरे काम  करणाºया उमेदवारालाच लोक मतदान करीत. आताच्या  जमान्यात प्रतिस्पर्धी उमेदवार  वाढले.स्पर्धा वाढली. निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी निवडणूक आयोग कार्यान्वित झाले. कायदे आणखी क्लिष्ट व कठोर करण्यात आले. हिशेब द्यावा लागतो. खर्च  मर्यादा आली.तथापि यातूनही पळवाटा काढून उमेदवाराला निवडून येण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले जाते.  काही ठिकाणी तर साम- दाम-दंड-भेद या नीतीचाही वापर करण्यात येतो. २०० ते २२० मतांचा वॉर्ड त्र्यंबक नगरपालिकेची स्थापना सन १८५४ साली अवघी दोन तीन हजार लोकसंख्या असताना तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली.  फ्लोटिंग पॉप्युलेशनवरील संख्या विचारात घेऊन पालिकेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला गावचा पाटीलच कारभार पाहत असे. पाटील (पोलीसपाटील) यांना समरी पॉवर असे. पोलीसपाटलांना दंड करण्याचादेखील अधिकार होता.कालांतराने लोकशाही पद्धत सुरू झाली. आणि निवडणुका होऊ लागल्या. २०० ते २२० मतांचा वॉर्ड असे. पूर्वीपासून ते साधारणपणे १९९० पर्यंत पक्षीय मतदान पद्धत नव्हती. व्यक्ती म्हणून मतदान होत असे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक