शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

जलतरण स्पर्धा घेण्याचा नूसता सोस नको ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:39 IST

सिंधुदुर्गातील मालवण येथील चिवला बीचवर गेल्याच आठवड्यात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी राज्यातील लहान-मोठे जवळपास दिड हजाराहून अधिक जलपटूंनी सहभाग नोंदविला यातच जलस्पर्धांचे महत्व व त्यासाठीची स्पर्धकांची तयारी लक्षात यावी. स्पर्धेपुर्वी दोन दिवसांपासून स्पर्धकांनी मालवणात गर्दी करून,

सिंधुदुर्गातील मालवण येथील चिवला बीचवर गेल्याच आठवड्यात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी राज्यातील लहान-मोठे जवळपास दिड हजाराहून अधिक जलपटूंनी सहभाग नोंदविला यातच जलस्पर्धांचे महत्व व त्यासाठीची स्पर्धकांची तयारी लक्षात यावी. स्पर्धेपुर्वी दोन दिवसांपासून स्पर्धकांनी मालवणात गर्दी करून, दररोज समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा सराव केला. स्पर्धकांचा उत्साह व तयारी पाहता त्यामानाने आयोजकांची या स्पर्धा नुसत्याच भरवण्यासाठी घेतल्या होत्या काय असा प्रश्न पडला. लागोपाठ दोन स्पर्धकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही चटका लावणारी घटना प्रत्येक स्पर्धकाला आजही बोचत आहे. या घटना टळू शकल्या असत्या जर त्यासाठी आयोजकांनी पुरेशी तयारी व सुरक्षा व्यवस्था ठेवली असती तर....सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राज्यस्तरीय समुद्री स्विमिंग कॉम्पिटीशन स्पर्धा घेण्यात आल्या. विविध वयोगटातील १४५० स्पर्धकांनी त्यात भाग घेतला. गेल्या ९ वर्षांपासून या स्पर्धा भरविल्या जात असल्या तरी, यंदा स्पर्धकांनी उच्चांक गाठला. या स्पर्धेत मीही ६३ वयोगटातील दोन कि. मी. ग्रुपमध्ये स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे २ दिवस आधीच मी देखील मालवण येथे पोहोचलो होतो. तशा वरवर नीटनेटक्या दिसणाऱ्या या स्पर्धेला गालबोट लागले दोन दिवसात २ स्पर्धकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात सौ. सुरेखा गलांडे ही स्पर्धक तर नाशिकचीच. स्पर्धेच्या आदल्या दिवशी काही स्पर्धक प्रॅक्टिससाठी स्पर्धेच्या ठिकाणी चिवला बीचवर आले होते. बोटीतून समुद्रात २ किंवा ३ कि. मी. अंतरावर बोटी समुद्रात स्पर्धकांना सोडत व तेथून किना-याकडे पोहत यायचे असा हा सराव होता. यासाठी प्रत्येक स्पर्धकााकडून १०० रुपये घेतले गेले. सौ गलांडे यांनी स्पर्धेच्या आदल्या दिवशी १५ डिसेंबरला सकाळी आपल्या एका मैत्रिणीसह प्रॅक्टिसला सकाळी १० वाजता सुरुवात केली व निम्मे अंतर कापल्यावर त्या गटांगळ्या खाऊ लागल्या. आजूबाजूच्या स्पर्धकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांच्या मदतीने त्यांना बोटीने किनाºयावर आणून रूग्णवाहिकेला फोन करून तेथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्या मृत असल्याचे घोषित करण्यात आले. दुसरी घटना तर स्पर्धेच्याच ठिकाणी घडली. ती देखील माझ्याच ग्रुपमधल्या स्पर्धकाच्या बाबतीत. माझ्या ६३ वयोगटाहून मोठ्या गटात मुंबईच्या घाटकोपर येथील अरुण वराडकर हे स्पर्धक होते. आमच्या ग्रुपमध्ये ८० स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातले वराडकर हे एक होते. आम्ही स्पर्धा पूर्ण करून फिनिशरचे मेडल गळ्यात घालून किनाºयावर थांबलो होतो. आमचे काही स्पर्धक अजून मागेच होते. तोच आमच्या कानावर गोंधळ ऐकू आला. मी धावत तिकडे गेलो. एका माणसाला बोटीतून किना-यावर आणण्यात आले होते. त्याला एक कार्यकर्ता त्यांना ‘माऊथ टू माऊथ’ श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करीत होता, तर एकदोन जण छातीवर दाब देऊन ‘हार्ट पम्पिंग’ करून सुरू करण्याचा प्रयत्न करीत होते. मी स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णाच्या जवळ गेलो व नाडी बघितली तर नाडी बिलकुल लागत नव्हती. मी डोळ्यांच्या बाहुल्यांची स्थिती बघण्यासाठी बॅटरीची विचारणा केली तर बॅटरीही मिळाली नाही. केस गेलेली असल्याचे जवळपास माझ्या लक्ष्यात आले होते. तेवढयात रूग्णवाहिका आली व त्यास तेथील ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशा लागोपाठ दोन दिवसात दोन घटना घडल्याने मी अस्वस्थ झालो. एव्हढया मोठ्या स्पर्धेसाठी त्याठिकाणी मेडिकल किंवा जीवरक्षक अशी कोणतीही तयारी नव्हती. ना रूग्णवाहिका ना आॅक्सिजन सिलेंडर, ना स्टेथोस्कोप ना बॅटरी. मला ह्या गोष्टींचे आश्चर्यच वाटले. स्पर्धा आयोजकांनी येथे वैद्यकीय कोणतीही सुविधा ठेवलेली नव्हती. पोहण्याची स्पर्धा एकतर जिवावरचीच असते. कोणी कितीही फिट असला तरी ऐनवेळी कुणाच्या नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरू शकतो, दमछाक होऊ शकते, इशारा करण्याचे त्याला शक्य होईलच असे नाही, सुरक्षा रक्षकांचे त्याच्याकडे लक्ष जाईलच याची पण गॅरंटी नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे समुद्राच्या पाण्यात पोहण्याची प्रोफेशनल स्पर्धकांशिवाय कोणालाच पोहण्याची सवय नसते. समुद्राचे पाणी खारट असते त्याचीही सवय नसते. आजूबाजूला अथांग पाणी आहे, पाय टेकण्यास किनाºयाशिवाय काही पर्याय नाही ही परिस्थिती काही स्पर्धकांचा आत्मविश्वास कमी करते, आणि क्षमता असूनही स्पर्धक गर्भगळीत होऊ शकतो. वास्तविक समुद्राच्या खा-या पाण्यात पोहणे स्विमिंग पुलमधल्या पाण्यात पोहण्यापेक्षा दुपटीपेक्षाही अधिक सोपे असते हे देखील बºयाच जणांना माहीत नसते. येथ ेतरअगदी जीवावर उदार होऊन हे स्पर्धक स्पर्धेत उतरल्याचे दिसले. त्यामुळे अशा ठिकाणी जीवरक्षक सुविधा कम्पलसरी केली पाहिजे, त्याशिवाय स्पधेर्ची परवानगी आयोजकांना दिली जाऊ नये. आयोजक स्पधेर्चे यश लाटण्याचा प्रयत्न करीत असतात व स्पर्धकांच्या जीवाशी खेळ होतो. एवढेच नव्हे तर या गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जाण्याचा प्रयत्न केला जात असतो. असेच मला तेथील वातावरणावरून दिसले. एका श्रोत्याने सभेत ही गोष्ट बोलून दाखवली तेव्हा घाईगर्दीत मृतांना श्रद्धांजली देण्यात आली व आयोजकांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला. स्पर्धेच्या आधी स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी करण्याची सक्ती करावी, रूग्णवाहिका, आॅक्सिजन फर्स्ट अ‍ॅड, डॉक्टर्स टीम अत्यावश्यक केल्या पाहिजेत. स्पर्धकांनीही फाजील आत्मविश्वास न बाळगता चांगल्या प्रशिक्षकाकडून माहिती व अनुभव घेऊनच स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरले पाहिजे. तरच स्पर्धकांचे प्राण वाचू शकतील. या निमित्ताने जीवाच्या बाबतीत सावधान व्हावे हेच खरे!-डॉ सुभाष डी पवार, नाशिक

टॅग्स :SwimmingपोहणेNashikनाशिक