शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती अन् ४५ दिवसांचे आरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:04 IST

कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती करावी अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.

ठळक मुद्देजिल्हा कालवा सल्लागार समिती बैठकीत आमदार नितीन पवारांची मागणी

कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती करावी अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.यावेळी छगन भुजबळ यांना कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रश्नासंदर्भातील निर्माण झालेल्या अडचणी व विविध मागणीचे निवेदन आमदार पवार यांनी यावेळी दिले.नाशिक जिल्हा रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली.नाशिक जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरु पयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी कृषीमंत्री दादा भुसेसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.चणकापूर प्रकल्प-गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात १ आवर्तनाचे नियोजन आहे. तसेच सिंचन व बिगर सिंचन आवर्तन एकित्रतपणे नियोजन करु न होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात आवर्तन देण्याचे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले.भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरु स्ती करण्याची सूचना केली. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई