शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर लादण्याची कोणालाही संधी देऊ नका

By admin | Updated: January 12, 2017 01:09 IST

संजय जोशी : वसंत पवार व्याख्यानमालेस प्रारंभ; मान्यवरांची होणार व्याख्याने

नाशिक : प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, आपल्यातील ईश्वराला प्रत्येकाने अनुभव व अभ्यासाच्या जोरावर ओळखणे आवश्यक आहे. कोणालाही आपल्यावर ईश्वराचे विशिष्ट रूप लादण्याची संधी देऊ नका, असे प्रतिपादन लेखक तथा व्याख्याते संजय जोशी यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएटएम महाविद्यालयातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि.११) डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना जोशी बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, उपसभापती नाना दळवी, संचालक राहुल ढिकले, नाना महाले, रामराव पाटील, भाऊसाहेब खातळे, आर. डी. शिंदे आदि उपस्थित होते.  जोशी म्हणाले, आयुष्यात स्वतंत्र विचार करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. परंतु, योग्य वयात योग्य पुस्तके वाचकांच्या हाती पडत नसून तसे मार्गदर्शनही मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  गीता व ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ जीवन जगायला शिकवतात. परंतु, नेमके या ग्रंथांचे वाचन आयुष्याच्या उत्तरार्धात करणारे अनेकजण असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आयुष्यात आपल्याला काय मिळवायचे आहे, हे निश्चित करून आपणच त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नीलिमा पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. (प्रतिनिधी)