The Diwali school holidays are delayed two days; Demand for teachers' team | शाळांची दिवाळी सुट्टी दोन दिवस पुढे ढकला ; शिक्षक संघाची मागणी 

शाळांची दिवाळी सुट्टी दोन दिवस पुढे ढकला ; शिक्षक संघाची मागणी 

ठळक मुद्देदिवाळीची सुट्टी पुढे ढकलण्याची शिक्षकांची मागणी सेवेचे दिवस गणले जाणार असल्याने फेरनियोजनाची विनंती

नाशिक : जिल्हा परिषद शाळांना यावर्षी  २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात २१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सेवेत असणाºया शिक्षकांना या सुट्टीचे दोन दिवस कामावरच राहावे लागणार असल्याने शाळांच्या सुट्टया दोन दिलसांनी पुढे ढकल्याव्या अथवा सुट्टी वाढवून द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा शिक्षक संघाने केली आहे. 
निवडणुक आयोगाने शनिवारी (दि.२१)  जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे संपूर्ण राज्यभरात २१ आॅक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविली  जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यभरातील शिक्षक निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी कर्तव्यावर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाचा  व मतदानानंतरचा दुसरा दिवस या दोन दिवसांची सुट्टी त्यांना मिळणार नाही. शिक्षक कर्तव्यावर असतानाही त्यांचा या दोन दिवसांचा कालावधी नियोजित दिवाळी सुट्टीत गणला जाणार असल्याने, यात अल्पसा बदल करून हे दोन दिवस पुढे वाढवून दिवाळी सुट्टी २३ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर अशी करण्यात यावी, तसेच १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने शाळा १३ नोव्हेंबर रोजी सुरू होतील,असे नियोजन बदलून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे  करण्यात आली आहे. 

Web Title: The Diwali school holidays are delayed two days; Demand for teachers' team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.