शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

साळसाणे, विटावेत दोन गटांत दंगल; दहा जणांना अटक

By admin | Updated: October 18, 2014 00:25 IST

साळसाणे, विटावेत दोन गटांत दंगल; दहा जणांना अटक

चांदवड : साळसाणे व विटावे येथे दोन गटांत निवडणुकीच्या कारणावरून दंगल झाल्याने चार जण जखमी झाले तर एक जणाची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गटाविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही गटांच्या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. पहिली फिर्याद नामदेव यादव कोल्हे (रा.साळसाणे शिवार) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यात रवींद्र ठाकरे, जिभाऊ ठाकरे, अण्णा पवार, सोपान पवार, व्यंकट पवार, बाबाजी जाधव आदिंनी साळसाणे शिवारातील कोल्हे यांच्या घरासमोर सर्व आरोपींनी फिर्यादी नामदेव कोल्हे यांचा चुलत भाऊ राधाजी कोल्हे हा कुरापत काढून लाठ्या - काठ्या, लोखंडीगज व तलवार घेऊन आंनदा कोल्हे, राधाजी कोल्हे, त्यांची पत्नी जिजाबाई , मुलगा मोठाभाऊ कोल्हे व सून शोभाबाई कोल्हे यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यात राधाजी कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी फिर्याद रवींद्र ठाकरे सरपंच विटावे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली. यात आरोपी राधाजी कोल्हे, मोठाभाऊ कोल्हे, नामदेव कोल्हे, व्यंकट पवार, लक्ष्मण पवार, सयाजी पवार, भाऊसाहेब पवार, विजय पवार, नीलेश पवार आदिंनी विटावे शिवारात विजय पांडूरंग कोल्हे यांच्या घरासमोर निवडणुकीच्या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी व साक्षीदार यांनी लाठ्या - काठ्या व तलवारीने मारहाण करून त्यांचे डोके फोडून दुखापत केली. याबाबत पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल झाले आसून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर व पोलीस तपास करीत आहेत.दरम्यान शासकीय १०१ ची रुग्णवाहीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भालचंद्र पवार, गणेश खालकर हे घटनास्थळी गेले व त्यांनी जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाकल केले. (वार्ताहर)