जिल्ह्याची पीक स्थिती उत्तमच

By Admin | Updated: January 2, 2017 00:27 IST2017-01-02T00:27:41+5:302017-01-02T00:27:41+5:30

जिल्ह्यातील शेती उत्पन्नान घट झाली असतानाही महसूल प्रशासनाने पीक स्थिती उत्तम असल्याचा दावा केला आहे.

The district's peak condition is very good | जिल्ह्याची पीक स्थिती उत्तमच

जिल्ह्याची पीक स्थिती उत्तमच

सटाणा : येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडिअम स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
मालेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नखाते म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाबरोबरच शारीरिक विकासासाठी क्र ीडा क्षेत्रात
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित पाहिजे. देशातील बहुतेक खेळाडू ग्रामीण भागातूनच तयार झाले आहेत. त्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.
मनात जिद्द असेल तर यश हमखास मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी कोठावदे, उत्तरा खानापुरे उपस्थित होत्या. यावेळी उत्तरा खानापुरे यांनी शालेय ते अंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवासातील अनुभव कथन केले. ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जिभाऊ सोनवणे, नितीन चंद्रात्रे, संचालक संजय ब्राह्मणकर, अशोक निकम, महेश देवरे, राजेंद्र भांगडिया, राजेंद्र अलई, अशोक चोपडा, शरद ततार, प्रशासकीय अधिकारी एन. एस. सोनवणे, मुख्याध्यापक एस. जी. निकम, उपमुख्याध्यापक जयश्री गुंजाळ आदि उपस्थित होते.
अंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष कडाले यांच्या हस्ते महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
(वार्ताहर)

Web Title: The district's peak condition is very good