शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालय : पोलीस मुख्यालयाची जागा; न्यायालय परिसराचा होणार विस्तार

By admin | Updated: March 13, 2017 01:46 IST

अडीच एकर जागेचे सीमांकन

नाशिक : पोलीस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयासाठी देण्यात येणार असून, या जागेचे शुक्रवारी (दि़१०) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सीमांकन करण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभाग हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करणार असून, येत्या गुरुवारी (दि़ १६) या जागेचे हस्तांतरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़ जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस वाढत जाणारे खटले, पक्षकार व वकिलांची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीतील जागा अपुरी पडत होती़ त्यामुळे जिल्हा न्यायालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा न्यायालयास मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड़ का़ का़ घुगे यांनी जनहित याचिका दाखल केली होती़ या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडे सुनावणी झाली़ पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागा मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़न्यायालयीन जागेसंदर्भात गृह विभागाने चर्चेद्वारे हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यामध्ये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह व विधी विभागाची संयुक्त बैठक घेऊन जागेच्या हस्तांतरणास संमती दिली. त्यानुसार पोलीस मुख्यालयाच्या ताब्यातील पाच एकरपैकी तूर्तास अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यातील अडीच एकर जागेचे सीमांकन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी हे सीमांकन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, याचिकाकर्ते अ‍ॅड. घुगे, वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके, अ‍ॅड. जयंत जायभावे आदिंसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)