जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:49 IST2019-03-12T17:47:44+5:302019-03-12T17:49:34+5:30
पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.

जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग
पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.
पिंपळगांव अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतील कोपऱ्यात असलेल्या बंद खोलीस आग लागल्याची माहिती अग्नीशमन विभागास मिळाली असता अग्नीशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
शॉक सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत मात्र वर्ष भरापासून बंद असलेल्या खोलीतील लाकडी बेंचेस वह्या, खोलीचे दरवाजे, खिडक्या छतावरील पत्र्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.