समाधान शिबिरात ट्रॅक्टर, औजारे व दाखले, कार्ड वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:47 PM2019-12-20T16:47:39+5:302019-12-20T16:49:08+5:30

कळवण -कळवण शहरातील जुन्या तहसील कार्यालय आवारात समाधान शिबिराचे आयोजन तहसीलदार, पोलीस निरीक्षक वर तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागाकडून करण्यात आले होते.

  Distribution of tractors, tools and certificates, cards in the camp | समाधान शिबिरात ट्रॅक्टर, औजारे व दाखले, कार्ड वितरण

  - महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिरात कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थीला औजारे वाटप करतांना सौ जयश्री पवार, डॉ पंकज आशिया, सौ रोहिणी महाले, कौतिक पगार, रवींद्र देवरे, विजय पाटील, रामा पाटील, राजेंद्र पवार विकास देशमुख आदि. 

Next
ठळक मुद्दे समाधान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेकांचे समाधान होईल असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी व्यक्त केला.


कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नगराध्यक्षा रोहिणी महाले, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, रावसाहेब शिंदे, कारभारी पगार, मोहनलाल संचेती आदीं उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार बी ए कापसे यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराची माहिती देऊन महसूल विभागाशी निगिडत प्रश्न सोडविण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती देऊन वर्तमान स्थितीत घडत असलेल्या गुन्हेगारी पाशर््वभूमीवरील घटनांचा उहापोह करु न कायदेविषयक मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यात नवीबेज, कनाशी, अभोणा, दळवट येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात महसूल विभागाकडून विविध दाखले वाटप, रेशनकार्ड वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था विषयक मार्गदर्शन करण्यात आले व कायद्याविषयक माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली शिवाय कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थीना ट्रॅक्टर, औजारे वाटप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या हस्ते या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.
शिबिरास उपनगराध्यक्ष जयेश पगार, माजी नगराध्यक्षा सौ सुनीता पगार, नगरसेवक अतुल पगार, नगरसेविका सौ अनिता जैन, सौ अनुराधा पगार, सौ भाग्यश्री पगार, सौ रंजना पगार,सौ अनिता पगार, रामा पाटील, राजेंद्र पवार, विश्वास पाटील, यांच्यासह कळवण परिसरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश गुप्ते यांनी मानले.
 

 

Web Title:   Distribution of tractors, tools and certificates, cards in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.