राज्य युवा पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 02:00 IST2019-03-09T01:59:56+5:302019-03-09T02:00:31+5:30
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू किसन तडवी यांचा समावेश आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार विजेते वेदांगी कुलकर्णी, अभिजित दिघावकर, साक्षी चितलांगे, किसन तडवी आणि स्नेहल चौधरी कदम यांच्यासमवेत विश्वास ठाकूर, अंकुश काकडे, खासदार सुप्रिया सुळे, विशाल तांबे, नीलेश राऊत आदी.
नाशिक : महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू किसन तडवी यांचा समावेश आहे.
पुण्यातील धनकवडी येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार भवन येथे झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिजीत दिघावकर यांना सामाजिक युवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर किसन तडवी यास क्रीडा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २१ हजार रु पये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिजीत दिघावकर सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीचे भारतातील एकमेव जागतिक युवा राजदूत आहेत. तर धावपटू किसन तडवी याने अनेक राष्टÑीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदारी कामगिरी केली आहे.
यावेळी पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, निलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यांचाही झाला गौरव
पुरस्कार वितरण सोहळ्यात सायकलपटू वेदांगी विवेक कुलकर्णी हिस विशेष क्रीडा युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. तर स्नेहल चौधरी कदम यांना सामाजिक युवा पुरस्कार तसेच साक्षी दिनेश चितलांगे हिस क्रीडा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.