मोहाडीतील गुणवंतांना पारितोषिकाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 10:04 PM2021-04-04T22:04:55+5:302021-04-05T00:43:38+5:30

दिंडोरी : कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे दिंडोरी तालुक्यातील तळेगावचे पहिले शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मरणार्थ मोहाडी विद्यालयात प्रथम येणाऱ्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

Distribution of prizes to the meritorious people of Mohadi | मोहाडीतील गुणवंतांना पारितोषिकाचे वाटप

मोहाडीतील गुणवंतांना पारितोषिकाचे वाटप

Next
ठळक मुद्देदिंडोरी : शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मरणार्थ उपक्रम

दिंडोरी : कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे दिंडोरी तालुक्यातील तळेगावचे पहिले शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मरणार्थ मोहाडी विद्यालयात प्रथम येणाऱ्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने शहीद यशवंत ढाकणे यांची प्रतिमा विद्यालयाला सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते.

व्यासपीठावर स्वातंत्र्य सैनिक भारत खांदवे, स्वातंत्र्य सैनिक शांताराम जाधव, चंद्रभान कळमकर, शिवाजी जाधव, हिरामण पिंगळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्यावतीने प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे स्वागत केले. दिंडोरी तालुक्यातील यशवंत ढाकणे हे तळेगाव येथील रहिवासी होते. १५ मराठा बटालियन या तुकडीमध्ये ते कार्यरत होते. काश्मीरमध्ये उडी सेक्टर चिनार पोस्टमध्ये शत्रूशी मुकाबला करीत असताना त्यांना वीरमरण आले होते.
त्यांच्या स्मरणार्थ मोहाडी विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व रोख बक्षिसे देण्याचे ठरविण्यात आले. याकामी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती गांगुर्डे, सर्जेराव देशमुख राजाराम जाधव, वसंत देशमुख, चंद्रभान जोशी, सुरेश जाधव आदींनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन आर. टी. गडाख यांनी केले तर आभार शरद निकम यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Distribution of prizes to the meritorious people of Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.