शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

निराधार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

By admin | Updated: September 26, 2016 23:54 IST

घोषणा : कसमादेतील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण, निवास मोफत

देवळा : राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्र म देवळा येथे संपन्न झाला. कसमादे परिसर विकास मंडळाच्या वतीने यापुढील काळात अनाथ व निराधार मुलांना दहावीपर्यंतच्या शिक्षण व निवासाची सोय मोफत करून देण्याची घोषणा यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली. येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्रम ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बच्चू कडू, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, सिनेअभिनेते भूषण कडू, जि.प.चे कृषी सभापती केदा अहेर,मंदार फणसे, संजय आवटे, अजित चव्हाण, विजय तनपुरे, प्राचार्य हितेंद्र अहेर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते. आमदार बच्चू कडू व भूषण कडू यांना शिवनिश्चल हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केदा अहेर यांनी मदतनिधी कार्यक्रमासाठी देवळा येथील सहकारी संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. राहुल अहेर यांनी आगामी काळात शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने आलेल्या अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना कसमादे परिसर विकास मंडळाच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण व निवासाची मोफत व्यवस्था करण्याचे संस्थेच्या वतीने जाहीर केले व ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी यांनी केले. भगवान अहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजय पगार, जयप्रकाश कोठावदे, डॉ. प्रशांत निकम, मुन्ना आहिरराव, डॉ. देवेंद्र चव्हाण, भाऊसाहेब पगार, भारत कोठावदे, अशोक अहेर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक आदि जिल्ह्यांसह गोवा येथील अनाथ व निराधार मुलामुलींना शहरातील मान्यवरांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री दादा भुसे यांनी मनोगतात शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा क्र ांती मोर्चांची दखल घेऊन मंत्र्यांपासून ते तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याची व त्यांच्याशी नीट वागण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीकडे गावातील अनाथ व निराधारांची अपंग व्यक्तींप्रमाणे नोंद झाली पाहिजे, असे मत आमदार बच्चू कडू यांनी यावेळी मांडले.