अपंग सहायता दिनीच दिव्यांगाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:50 IST2019-03-16T00:47:22+5:302019-03-16T00:50:13+5:30
शुक्रवारी सर्वत्र जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा होत असताना वाहने उचलणाऱ्या टोर्इंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र एका दिव्यांगाला हीन वागणूक देण्यात आली. वाहनावर ‘अपंगत्वाचे वाहन’ असे बोधचिन्ह असतानाही कर्मचाºयांनी कोणतीही उद्घोषणा आणि नोंद न करता वाहन उचलून नेलेच शिवाय वाहन सोडविण्यासाठी तब्बल दीड तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला.

अपंग सहायता दिनीच दिव्यांगाची अवहेलना
नाशिक : शुक्रवारी सर्वत्र जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा होत असताना वाहने उचलणाऱ्या टोर्इंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र एका दिव्यांगाला हीन वागणूक देण्यात आली. वाहनावर ‘अपंगत्वाचे वाहन’ असे बोधचिन्ह असतानाही कर्मचाºयांनी कोणतीही उद्घोषणा आणि नोंद न करता वाहन उचलून नेलेच शिवाय वाहन सोडविण्यासाठी तब्बल दीड तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शरद ठाकरे हे अपंग बांधव आपल्या चारचाकी वाहनातून पंडित कॉलनीत खरेदीसाठी आले असता त्यांनी विषम तारखेनुसार रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले होते. याचवेळी आलेल्या टोर्इंग वाहनातील कर्मचाºयांनी गाडी टोर्इंग करून घेऊन गेले. विशेष म्हणजे नियमानुसार गाडी उचलण्यापूर्वी तशी उद्घोषणा करावी लागते आणि गाडी उचलल्यानंतर रस्त्यावर तसे नमूद करावे लागते. मात्र यापैकी काहीही न करता अपंगत्वाची असलेली ‘इनव्हॅलिड कार’ कर्मचाºयांनी उचलून नेली.
सदर प्रकार लक्षात आल्यानंतर ठाकरे यांनी जुने आयुक्तालयात गाडी घेण्यासाठी गेले असता त्यांनी आपण अपंग असल्याचे आणि गाडीदेखील अपंग कॅटेगरीतील असल्याचे कागदपत्रे संबंधितांना दाखविले. मात्र सुरुवातीला कुणीही त्यांचे कागदपत्रे पाहिले नाही तसेच आपण अपंग असल्याचे ते सांगत असतानाही त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. सुमारे तासभर ते पोलीस आणि ठेकेदाराकडील माणसांची विनवणी करीत होते. मात्र ठेकेदाराकडील मंडळी काहीही ऐकत नव्हते.
पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला
शरद ठाकरे यांनी टोर्इंग कर्मचाºयांना सर्व प्रकार सांगूनही कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याउलट तुम्हाला गाडी हवी असेल तर तुम्ही पोलीस आयुक्तांना जाऊन भेटा त्यानंतरच गाडी सोडली जाईल, असा सल्ला येथील कर्मचाºयांनी ठाकरे यांना दिला. दिव्यांग असो वा दिव्यांग संघटनेचा पदाधिकारी आयुक्तांना भेटून या असे म्हणत ठाकरे यांची अडवणूक केली, असे ठाकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. सुमारे तासभर ठाकरे यांना वाहतूक पोलीस आणि ठेकेदार यांची विनवणी करावी लागली़