शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेवर चर्चा

By admin | Updated: October 25, 2016 23:36 IST

निमा-पोलीस बैठक : दिवाळीच्या सुटीत गस्तीची मागणी

सिन्नर : औद्योगिक क्षेत्रात वाढती गुन्हेगारी व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात वाढ करण्यात यावी यासाठी निमाचे पदाधिकारी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एच. पी. कोल्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.माळेगाव औद्योगिक वसाहतीत सातत्याने घडणाऱ्या चोऱ्या, लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, सर्व उद्योजक यासाठी आवश्यक ते सहकार्य करतील, माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्याव्या आदि मागण्या निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी केल्या. दिवाळीत कामगारांना मिळणारा बोनस व दर महिन्याच्या सहा ते दहा तारखेला होणारे पगार या बाबी लक्षात ठेवून चोरटे कामगारांची लूटमार करत असल्याचे ते म्हणाले. कारखान्यांच्या आवारातील भंगार चोरीचे प्रमाण वाढले आहे. भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या टोळ्या औद्योगिक क्षेत्रात सक्रिय असून, सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास त्या घाबरत नाही, अशा टोळ्यांवर कडक कारवाई करावी, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोऱ्या व लूटमारीचे प्रकार रोखण्यासाठी औद्योगिक वसाहतीच्या सहा प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स थांबा उभारून दिवस-रात्र गस्तीपथक नेमावे आदि मागण्या निमाचे अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर यांनी मांडल्या. बैठकीस टी. एन. अग्रवाल, सुरेंद्र मिश्रा, एस. के. नायर, किरण जैन-खाबिया, प्रवीण वाबळे, शिवाजी आव्हाड, योगेश मोरे, किशोर इंगळे, सचिन कंकरेज, ए.आर. निमकर, एस.एन. बारी, बी.के. यादव, आर. डी. खेले, व्ही.एस. कडभाने, राहुल शुक्ल, सदाशिव बोरसे, पांडुरंग कान्हे, एस. एस. घुगे, आशिष जीनतुरकर, नीलेश कांबळे, कैलास वाजे आदिंसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)