शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिन्नर नागरी’त असंतोष

By admin | Updated: April 10, 2017 01:24 IST

सिन्नर : मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

 सिन्नर : ठेवींची मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर येत्या बुधवार (दि. १२) रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सिन्नर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांची बैठक पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून पैसे मिळावे यासाठी विनवण्या करुन निवेदने देवून पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त झाल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी सहकार खात्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ठेवीदारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. येत्या बुधवारी (दि. १२) रोजी सर्व ठेवीदार नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतरही पंधरा दिवसात ठेवीदारांना पैसे न मिळाल्यास मुंबईला मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. संस्थेच्या संचालक मंडळाची लवकरच निवडणूक होणार असून संस्था अवसानायात जावू नये यासाठी सभासदांकडून निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी यावेळी घेण्यात आली. संस्थेच्या कारभार पूर्ववत सुरु व्हावा अशी इच्छा अनेक ठेवीदार व सभासदांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संस्थेचा कारभार सिन्नर येथील शाखेतून चालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेकांनी ठेवी परत देतांना अधिकाऱ्यांनी ३० टक्के रक्कम काढून घेतल्याचा आरोप बैठकीत केला. यावेळी सेवानिवृत्ती प्राचार्य डॉ. आर. डी. पवार, सुभाष जाजू, कृष्णा पवार, डॉ. दिनेश क्षत्रिय, डॉ. जी. एल. पवार, आर. आर. कौठे, मोहन कर्पे, श्रीपाद भसे, खंडेराव सांगळे, अशोक गवळी, संतोष कदम, रोशन पवार, भीमाबाई सानप, सुरेश गजवार, विजय खर्डे, लक्ष्मण पानसरे, बाळू भाबड, सुदाम खर्डे, बालाजी साळी यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.(वार्ताहर)