स्मार्ट सिटी धोरणात्मक निर्णयाबाबत संचालकच अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:51 AM2019-06-12T00:51:52+5:302019-06-12T00:52:09+5:30

तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंधळ वाढला आहे.

Director of smart city policy decision in the dark | स्मार्ट सिटी धोरणात्मक निर्णयाबाबत संचालकच अंधारात

स्मार्ट सिटी धोरणात्मक निर्णयाबाबत संचालकच अंधारात

Next
ठळक मुद्देस्काडा मीटर प्रकरण : थविल यांच्या आरोपामुळे वाढला गोंधळ

नाशिक : तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. मीटर खरेदी प्रकरणात परस्पर बदल करणे ही धोरणात्मक बाब असून, त्याबाबत संचालकच अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना परस्पर धोरण बदलाचा अधिकार कोणी दिला? असा थेट प्रश्नच काही संचालकांनी मंगळवारी (दि.१०) उपस्थित केला आहे.
संपूर्ण शहरात अचूक आणि अत्याधुनिक पद्धतीने जलमापन करण्यासाठी नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून दोन लाख स्काडा मीटर खरेदी करण्यात येणार आहेत. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतर ज्यावेळी निविदा भरण्याची तीन दिवसांची मुदत होती, त्यावेळी निविदेत अनेक फेरबदल शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात आल्याने हा वादाचा विषय ठरला होता. विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेवून हे सर्व बदल करण्यात आल्याचा संशय कंपनीच्या संचालक असलेल्या महापालिका पदाधिकाºयांना होता. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार गेल्यानंतर त्यांनी आधी निविदेला स्थगिती दिली आणि नंतर ती निविदाच रद्द केली. त्यानंतर संचालकांच्या तक्रारींमुळे थविल यांची गच्छंती करण्याची वेळ आली असतानाच त्यांनी कंपनीची बदनामी होत असल्याचे निमित्त करून मीटर खरेदी प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यात कंपनीचे अध्यक्ष सीतराम कुंटे यांच्या संमतीने बदल झाल्याचे सांगून त्यांनाच एकप्रकारे वादात ओढले आहे.
यासंदर्भात कंपनीचे संचालक तथा महापालिकेतील विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, शाहू खैरे आणि गुरुमित बग्गा यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न केले.
मीटर खरेदी प्रकरणात अचानक बदल केल्याची तक्रार आमदार फरांदे यांनी सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनीच निविदा रद्द केली. त्यानंतरही निविदेतील बदल हे कुंटे यांच्या सहमतीनेच झाल्याचा दावा थविल
करीत असतील तर मग कुंटे यांनी निविदा का रद्द केली त्याचे उत्तर कुंटे हेच देऊ शकतील; मात्र मीटर तीन टप्प्यांत बसविणे म्हणजे निविदेचे तुकडे करणे असते, असा टोला या संचालकांनी लगावतानाच असे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार थविल यांनी कसे काय वापरले, असा प्रश्न त्यांनी केला.
तेव्हा कंपनीची बदनामी झाली नव्हती का?
स्काडा प्रकरणात थविल यांच्या विरोधात तक्रारी झल्यानंतर त्यांनी कंपनीची बदनामी होत असल्याचा आरोप करून खुलासा केला असल्याचे नमूद केले आहे; मात्र त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, अशावेळी कंपनीची बदनामी होत नाही काय? फुले कलादालनाच्या छताचा भाग मध्यंतरी पडला. असे निकृष्ट काम असूनही त्या ठेकेदाराला आणखी पन्नास लाख रुपये ज्यादा देण्याचा प्रस्ताव मांडला जातो, ती कंपनीची बदनामी नाही काय? असा प्रश्न बोरस्ते, खैरे आणि बग्गा यांनी केला आहे.

Web Title: Director of smart city policy decision in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.